शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनास मोहन अंकले यांची रू १०००० ची देणगी

कोल्हापूर : मोहन अंकले यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारतीकरीता १०००० रू. ची देणगी दिली. या प्रसंगी त्यांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व  प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील  यांनी केला या प्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी शकुंतला अंकले उपस्थित होत्या. मोहन अंकले यांनी १९६० मध्ये कराड येथे सहाय्यक ऑडीटर म्हणून कामास सूरवात केली व त्या नंतर महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन येथे मुख्य अधिकारी म्हणून काम केले. तसेच त्यांनी शेतकरी सहकारी संघ मध्ये सुध्दा काम केले आहे. आता ते कोल्हापूर मध्ये वास्तव्यास आहेत.

Advertisement
Donation by Mohan Ankle to Bhagwan Mahavir Adhyasana of Shivaji University

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी मोहन अंकले यांचे आभार मानले. भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ती व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page