“डू इट युअरसेल्फ” ही स्व-शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत आहे – डॉ सुभाष पवार
पुणे : विविध शिक्षण पद्धतींपैकी डू इट युअर सेल्फ (DIY) ही आयुष्यभर शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे, असे मत प्रख्यात प्राध्यापक, लेखक आणि कलाकार डॉ सुभाष पवार यांनी व्यक्त केले.
जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींच्या दोन दिवसांच्या प्रदर्शनाच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर, सुरभी प्रणव आणि बी टेक प्रथमवर्ष च्या अधिष्ठाता डॉ वंदना धुरेजा उपस्थित होत्या.







डॉ सुभाष पवार म्हणाले की, डू इट युअर सेल्फ ही पद्धत सहयोगी शिक्षणासाठी संधी देते. अभियांत्रिकीआणि कला विद्याशाखा ह्याएकमेकांस पुरक कौशल्ये असणाऱ्या शाखा आहेत. अभियंत्यांकडे सर्जनशील कौशल्ये असली पाहिजेत. जग तुमच्यासमोर अनेक आव्हाने उभी करेल, पण तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले आणि कष्ट केल्यास यश मिळेल.
डीआयवाय क्लब अंतर्गत, विद्यार्थ्यांनी पोस्टर्स, रेखाचित्रे, खाद्यपदार्थ, फोटो, हस्तकला यासारख्या कलाकृती तयार केल्या. यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणात अपेक्षित असलेल्या सर्जनशीलता आणि डिझाइनच्या उद्दिष्टांना चालना मिळत आहे.
रायसोनी काॅलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले. त्यांनी सुप्त भावना व्यक्त करण्यासाठी डिजिटल कलांचा वापर केल्याबद्दल विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरभी प्रणाम यांनी परिश्रम घेतले. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी अभियांत्रिकी शिक्षणात नवीन अध्यापनाच्या प्रतिभेचा वापर केल्याबद्दल कौतुक केले.