दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मेघे अभिमत विद्यापीठात ७५वा गणतंत्रदिन साजरा भारताचे संविधान हे जगात सर्वोत्तम – कुलगुरू डाॅ. ललितकुमार वाघमारे
वर्धा : सर्व घटकांचा सारासार विचार करीत सर्वांना समान न्याय आणि अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला लाभले आहे. हे जगातील सर्वोत्तम संविधान असून नंतरच्या काळात स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांसाठी भारतीय संविधान मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डाॅ. ललितकुमार वाघमारे यांनी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात आयोजित ७५ व्या प्रजासत्ताक दिन समारोहात केले.
प्रारंभी अभिमत विद्यापीठाच्या मास्टर इन हेल्थ केअर अँड ऍडमिनिस्ट्रेशन शाखेतील गुणवंत विद्यार्थी दीपक कनोजिया याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समारोहाला प्रकुलगुरू डाॅ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, कार्यकारी संचालक डॉ. तृप्ती श्रीवास्तव वाघमारे, डॉ. सुनीता वाघ, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पेठे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. केटीव्ही रेड्डी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इर्शाद कुरेशी, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य इंदू अलवाडकर, डॉ. अनिता वंजारी, डॉ. पल्लवी डायगव्हाणे, डॉ. बाबाजी घेवडे, कर्नल कुलदीप सहगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. तर राष्ट्रगीताने या समारोहाचे समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुमित उगेमुगे यांनी केले. तर आभार कर्नल कुलदीप सहगल यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात क्रीडा अधिकारी अफसर पठाण, सुरक्षा अधिकारी गणेश काळे, प्रशासकीय अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले. या समारोहाला संस्थेतील विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक पथक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.