आविष्‍कार महोत्सव’चे जिल्हानिहाय आयोजन

संभाजीनगर जालन्यातील स्पर्धा आठ ऑक्‍टोबरला

बीड धाराशिव महोत्सव १० रोजी होणार

नाव नोंदणीसाठी पाच ऑक्टोबरपर्यंत मुदतवाड

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन ८ व १० ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ कैलास अंभुरे व आविष्‍कार समन्‍वयक डॉ भास्कर साठे यांनी दिली.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

विद्यार्थ्‍यांमधील सुप्‍त नावीन्‍यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्‍कार व्‍हावा, त्‍यांच्‍यामध्‍ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्‍यांना अधिछात्रवृत्तीच्‍या स्‍वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे २००६ पासून ‘आविष्‍कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.

यावर्षीचा राज्‍यस्‍तरीय ‘आविष्‍कार’ बाटू लोणेरे येथे जानेवारी २०२५ मध्‍ये संपन्‍न होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्‍हणून कुलगुरू प्रा विजय फुलारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन करून त्‍यानंतर विद्यापीठस्‍तरीय आविष्‍कार संपन्‍न होणार आहे.

शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमधील संशोधन कल्‍पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्‍हावेत यासाठी यावर्षीचा आविष्‍कार प्रथमत: जिल्‍हास्‍तरावर घेण्‍यात येत आहे. आठऑक्‍टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना आणि १० ऑक्‍टोबरला बीड व धाराशीव येथे हे अधिवेशन संपन्‍न होत आहे.

Advertisement

नोंदणी – १६ सप्‍टेंबर ते दि ५ ऑक्टोबर

ज्ञानशाखानिहाय सहा गट : पहिला गट – मानव्‍यविद्या, भाषा आणि ललित कला, दुसरा गट – वाणिज्‍य, व्‍यवस्‍थापन व विधी, तिसरा गट- विज्ञान, चौथा गट- कृषी व पशुसंवर्धन, पाचवा गट – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि सहावा गट – औषधनिर्माणशास्‍त्र यांचा समावेश
विद्यार्थ्‍यांचे तीन स्‍तर : पदवी (युजी), पदव्‍युत्तर पदवी (पीजी) आणि पदव्‍युत्तर पदवीनंतरची पदवी (पोस्‍ट पीजी)

वयोमर्यादा : पदवी- वय वर्ष २५, पदव्युत्तर पदवी- ३० आणि पोस्‍ट पीजीकरिता वयोमर्यादा नाही.

जिल्‍हा समन्‍वयक : छत्रपती संभाजीनगर- प्रा दीपक पाचपट्टे, प्रा प्रवीण यन्‍नावार; जालना- प्रा पुरुषोत्तम देशमुख, प्रा रमेश चौंडेकर; बीड- प्रा बी एन डोळे, प्रा शशांक सोनवणे; धाराशिव – प्रा आनंद देशमुख, डॉ सादीक बागवान;

महाविद्यालय समन्‍वयक : छत्रपती संभाजीनगर – प्रा विष्‍णू पाटील, प्रा दिनेश लिंगमपल्ले; जालना-प्रा राम चव्‍हाण, प्रा संदीप पाटील; बीड- प्रा अशोक डोंगरे, प्रा अरविंद आघाव; धाराशिव – डॉ सुयोग अमृतराव, प्रा महेश माने.

स्‍थळ : छत्रपती संभाजीनगर – देवगिरी महाविद्यालय, जालना – मॉडेल कॉलेज, बीड – के एस के महाविद्यालय, धाराशिव – विद्यापीठ उपपरिसर

मुख्‍य संयोजन समिती : समन्‍वयक डॉ भास्‍कर साठे, प्रा बी एन डोळे, प्रा प्रवीण यन्‍नावार, प्रा शशांक सोनवणे, प्रा पुरुषोत्तम देशमुख, प्रा आनंद देशमुख, डॉ सचिन भुसारी, डॉ सतीश भालशंकर, डॉ सुहास पाठक, प्रा राम कलाणी, डॉ माधुरी सावंत, डॉ स्मिता साबळे

प्रमुख मार्गदर्शक : कुलगुरू प्रा विजय फुलारी,

मार्गदर्शक : प्र-कुलगुरू प्रा वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा प्रशांत अमृतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page