जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची गोंडवाना विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या अल्फा अकॅडेमीला भेट

प्रशिक्षण प्रगतीचा घेतला आढावा

गडचिरोली : जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या अल्फा अकॅडमी ला जिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी भेट देऊन अल्फा अकॅडमी ची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी अल्फा अकॅडमीत शिकविल्या जाणाऱ्या “प्रोफेशनल फूल स्टॅक वेब डेव्हलपमेंट “ या कोर्सचा व मागील २ वर्षात विद्यार्थ्यानी केलेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. या प्रसंगी मागील बॅच मधून लर्नकोच या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

District Collector Avishyant Panda visits Alpha Academy under Gondwana University

विद्यार्थ्यानी प्रोग्रामिंगच्या भाषा शिकून , असलेल्या तंत्रयुगीन काळात वेब डेव्हलपमेंट, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारखे तंत्रज्ञान शिकून त्याचे कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या प्रसंगी अल्फा अकॅडमीचे नोडल अधिकारी डॉ कृष्णा कारू, लर्नकोच कंपनीचे संस्थापक मनिष तिवारी, अल्फा अकडेमीचा प्रशिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

अल्फा अकॅडेमी येथे या वर्षी ५०० प्रशिक्षणार्थी “प्रोफेशनल फूल स्टॅक वेब डेव्हलपमेंट“ चे प्रशिक्षण घेत होते. त्यापैकी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थीना रोजगार प्राप्त झालेला आहे. अकॅडेमीच्या विद्यार्थ्यामध्ये डिजिटल कौशल्य अवगत व्हावे यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जात असून, विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होत पर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो. प्रसंगी अल्फा अकॅडेमी मध्ये शिकत असलेल्या कौशल्यातून तंत्रज्ञानापासून प्रशिक्षणार्थीना रोजगाराहेतु होत असलेल्या लाभाची माहिती लर्नकोच कंपनीचे संस्थापक मनिष तिवारी यांनी दिली. सद्यस्थित अल्फा अकॅडमी येथे ५०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून त्यातील २०० विद्यार्थी सदर कोर्से मध्ये इंटर्नशिप करत असल्याची माहिती अल्फा अकॅडमीचे नोडल अधिकारी डॉ कृष्णा कारू यांनी दिली.

अल्फा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांचे व गोंडवाना विद्यापीठाचे अभिनंदन केले आणि भविष्यात यापुढे शिक्षण क्षेत्रातील दर्जात वाढ करण्यासाठी राज्य सरकारचे पाठबळ मिळवण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीने अल्फा अकॅडेमीने महत्त्वपूर्ण प्रगतीचा टप्पा गाठला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page