डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशात शिक्षणाच्या संधी या वर संवाद सत्र
विदेशातील शिक्षणासाठी केंद्र-राज्यशासनाचे सहकार्य – संचालक डॉ.सचिन देशमुख यांचे प्रतिपादन
औरंगाबाद, दि.२५ : विदेशात शिक्षणासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत तसेच केंद्र व राज्य सरकारच्या ही योजना असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘नवोन्मेष’ मंडळाचे संचालक डॉ.सचिन देशमुख यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात शिक्षणाच्या संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व संवाद सत्र घेण्यात आले. नवोपक्रम, नवोन्मेष व साहचर्य, तसेच सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स व अंतर्गत गुणवत्ताहमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ठआंतरविद्याशाखीय संशोधन व पदव्युत्तर शिक्षणाच्या परदेशातील संधीठ या विषयावर विद्यापीठविभागातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी सिफार्ट सभागृह येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन व परस्परसंवादी सत्राचे आयोजन करण्यात आले.
डॉ. भालचंद्र वायकर (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. सदरील कार्यशाळेत डॉ. नानासाहेब थोरात (Principal Investigator, युनिव्हर्सिटी ऑफ लिम्रिक, आयर्लंड) तसेच डॉ. टोफेल सय्यद (विभागप्रमुख पदार्थविद्यान, युनिव्हर्सिटी ऑफ लिम्रिक, आयर्लंड) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सचिन देशमुख (संचालक, नवोपक्रम, नवोन्मेष व साहचर्य) यांनीप्रास्ताविक केले. डॉ. नानासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अनुषंगाने संशोधनातील आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. टोफेल सय्यद यांनी युरोपियन देशांमधील पदव्युत्तर अभ्यास व संशोधनातील संधीयाविषयावर चर्चा केली. डॉ. बिना सेंगर (संचालक, सेंटर फॉर इंटरनॅशनल रेलेशन्स) यांनी आभारप्रदर्शन केले. विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थी, संशोधक तसेच प्रा. डॉ, एन. एन बंदेला (संचालक, आयक्यूएसी), प्रा. डॉ. बी. एन. डोळे, डॉ. भास्कर साठे, डॉ. प्रभाकर उंद्रे, डॉ. कीर्ती जावळे, डॉ. निर्मला जाधव आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संगणकशास्त्रविभाग, अटल इन्क्युबेशन सेंटर, सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
(सोबत फोटो जोडले आहेत.)