देवगिरी अंभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गुगल सोल्युशन जागतिक स्पर्धेत यश
टॉप 10 मध्ये स्थान मिळाले
छत्रपती संभाजीनगर : “गुगल सोल्युशन चॅलेज” हि एक जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वैश्विक समस्यांवर स्पर्धा मोफत तंत्रज्ञानिक उपाय बनविण्यास प्रोत्साहन दिले जाते. संपुर्ण जगात जवळपास 2.4 अब्ज किंवा 29 टक्के लोक भुकेले व्याकुळ आहेत. भारत हा हंगर इंडेक्स मध्ये 125 देशांपैकी 111 व्या स्थानी आहे. देवगिरी इन्स्टीटयुटच्या इनोव्हेशन स्कॉड ने “स्पूनशेअर” हे ॲप हया स्पर्धेत विकसित केले आहे, जे की आवश्यकतेनुसार गरजू आणि अन्नदात्यांच्या संपर्कात येवू शकतो आणि आपल्या परिसरातील गरजू, भुकेल्या लोकांना अन्न मिळवून देऊ शकतो.
गुगल आयोजित स्पर्धेत देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी एक अव्दितीय कामगिरी केली आहे व गुगल सोल्युशन चॅलेंजमध्ये जागतिक पातळीवर टॉप-10 मध्ये स्थान मिळवून त्यांनी संस्थेचे नाव उज्वल केले आहे. भारतातून केवळ दोन टिम या यादीत आहेत त्यापैकी एक म्हणजे देवगिरीच्या विद्यार्थ्यांची “स्पूनशेअर टिम”.
स्पूनशेअर टिम मध्ये सानिका चव्हाण (टिम लिडर), कृष्णा औटी, मोहम्मद रेहान, आणि शुभम पिटेकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले ॲप संयुक्त राष्ट्रांच्या “शुन्य भूक” या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी अन्नदात्यांना गरजू लोकांशी जोडते आणि त्यामुळे अन्न वाया जाणे कमी होते.
या टिमचा प्रवास खुप प्रेरणादायक राहिला आहे. 5 एप्रिल 2024 रोजी त्यांनी टॉप 100 मध्ये स्थान मिळविले आणि नंतर 28 मे 2024 रोजी त्यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळविले. या अव्दितीय यशासाठी गुगल तर्फे प्रत्येक टीम सदस्याला $ 1000 (रु. 84000/-) आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
ॲप कसे वापरायचे?
स्पूनशेअर ॲपला गुगल वरुन तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने लॉगीन करु शकतात नंतर जर कुणी मोफत अन्न, अतिरीक्त अन्नाबाबत (लग्नकार्य, मुंज, भंडारा इ) माहिती दिल्यानंतर आमचे व्हेरीफाईड एनजीओ पुर्नाविलोकन करुन संमत्ती देईल त्यानंतर हि सर्व अन्न सुविधा माहिती होम पेजवर दाखविली जाते जी प्रत्येकाला सहज दिसू शकते. एन जी ओ कार्यकर्ते त्या ठिकाणावर जाऊन उरलेले अन्न गोळा करुन ते गरजू उपाशी लोकांपर्यंत पोहचवतील. शिजवलेल्या अन्नाचे आयुष्य खूपच कमी असते व उन्हाळयाच्या दिवसात तर अन्न लवकर खराब होते अशा परिस्थितीत एन जी ओ कार्यकर्ते खराब अन्न संकलन करुन ते खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीला देतात.
सध्या या ॲपच्या 1000 हून अधिक डाऊनलोडस् आहेत आणि त्यांचे पुढील ध्येय जागतिक पातळिवर टॉप 3 मध्ये स्थान मिळवणे आहे. इनोव्हेशन स्कॉड ने सर्वांना आवाहन केले आहे की त्यांनी प्ले स्टोअरवरुन स्पुनशेअर ॲप डाऊनलोड करुन आपल्या मित्रपरिवारात शेअर करावे.
स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख प्रा संजय कल्याणकर, डॉ राजेश औटी, डॉ शोएब शेख, डॉ सत्यवान धोंडगे, डॉ सचिन बोरसे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ रुपेश रेब्बा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.