गोंडवाना विद्यापीठात उच्च शिक्षणातील बदलांबाबत संवाद बैठक
गडचिरोली : नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत चर्चा करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि महाराष्ट्र राज्य विद्याशाखा प्रबोधनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद सत्र बैठकीचे आयोजन विद्यापिठाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे महाव्यवस्थापक कल्याणी गोखले यांनी विद्यापिठाच्या सलांग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधल्या.
मंचावार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ श्रीराम कावळे प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, होते प्रमुख अतिथी म्हणून कल्याणी गोखले महाव्यवस्थापक एमएसएफडीए तसेच डॉ अनिल हिरेखान कुलसचिव आणि डॉ कृष्णा कारू प्राचार्य आदर्श पदवी महाविद्यालय यांची उपस्थिती होती.


डॉ श्रीराम कावळे यांनी अध्यक्ष भाषणात नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीभिमुख असून विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्येसंदर्भात प्राध्यापकांनी समस्येचा निराकरणासाठी प्रयत्न करत असल्याचे भाष्य केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे कौशल्य आधारित तरुण तयार होईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याता कल्याणी गोखले यांनी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासोबत नवीन शैक्षणिक धोरणाविषयी संवाद साधल्या. तसेच महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था अंतर्गत अध्यापकाना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण आणि त्याचे स्वरूप या विषयी माहिती देऊन शॉर्ट व्हिडीओ च्या माध्यमातून सदर संस्थेच्या प्रशिक्षण कशा प्रकारचे असते आणि प्रशिक्षणानंतर अध्यापन क्षेत्रात होणाऱ्या बदल याची ओळख करून दिले. आणि विद्यापिठाच्या संलग्नित महाविद्यालयाला मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या समस्ये विषयी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी चर्चा केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कृष्णा कारू यांनी केले तर संचालन डॉ प्रिती भांडेकर आणि आभार सहा. प्राध्यापक. सुदर्शन जानकी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन आदर्श पदवी महाविद्यालय यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी सहकार्य केले.