महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त धन्वंतरी पूजन संपन्न

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ भगवान धन्वंतरीचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, महेंद्र कोठावदे, डॉ आर टी आहेर, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे उपस्थित होते.

आरोग्य विद्यापीठात भगवान धन्वंतरीचे पूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी राजेंद्र नाकवे, संतोष कोकाटे नितीन काळे, दिपक सांगळे, प्रल्हाद सेलमोकर, प्रविण पटले, डॉ अनुश्री इंडाइत, डॉ वैशाली गंभीरे, दिपक मोरे, संतोष गरुड, गजानन सुर्यवंशी, संदीप नंदन, विजय सोनवणे, सुरेश शिंदे, सानिया भालेराव, सुवर्णा खैरनार, अनिता मोहिते, मोहन सोळशे, शर्मिली वाघ आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com