हिंदी विश्वविद्यालयात ‘विकसित भारत@2047 : संकल्‍पना व एकात्‍म मानववाद’ विषयावर राष्‍ट्रीय चर्चासत्र संपन्न

सुरक्षा, सन्मान व संधींची समानता यातून विकसित भारताची संकल्पना होईल साकार – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

वर्धा : महात्‍मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्‍याय यांच्या 56व्या पुण्‍यतिथीनिमित्त ‘विकसित भारत@2047 : संकल्‍पना व एकात्‍म मानववाद’ विषयावर आयोजित राष्‍ट्रीय चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून संबोधित करतांना राज्य सभेचे माजी सदस्‍य डॉ. विनय सहस्‍त्रबुद्धे म्हणाले की एक नागरिक म्हणून सुरक्षा, सन्मान आणि संधींची समानता प्राप्त झाली तर भारत एक होईल आणि विकसित भारताची संकल्पना साकार होऊ शकेल.

रविवार 11 फेब्रुवारी रोजी ग़ालिब सभागृहात कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी विशिष्‍ट अतिथी म्हणून वर्ध्याचे खासदार रामदास तडस उपस्थित होते.
डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की विकसित भारत व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन यात एक स्वाभाविक संबंध आहे. भारत एक राहिला तर विकसित होईल. आम्ही एक व एकात्म राहू, श्रेष्ठता प्राप्त करु तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न सार्थक होईल. सांस्कृतिक एकता ही आपली वास्तविकता आहे असेही ते म्हणाले. वैश्विक पटलावर भारताची नवी ओळख निर्माण होत आहे असे सांगून ते म्हणाले की भारतीय दृष्टिकोनातून विश्वाचे समाधान शक्य आहे. त्यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्व-भाव, स्व-भाषा व स्व-भूषा या विचारांचा उल्लेख करत सांगितले की हुए आपल्या भाषेमधून शिक्षण हाच विकासाचा महत्वपूर्ण बिंदु होय.‌ दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्वज्ञानाचा उल्लेख करुन ते म्हणाले की भाग्यशाली लोकांनी इतरांप्रती संवेदना ठेवली पाहिजे, हीच एकात्म मानववाद व विकसित भारताची पहिली अट होय.

Advertisement

खासदार रामदास तडस म्हणाले की पंडित दीनदयाल उपाध्याय एक राष्ट्रभक्त होते. त्यांच्या विचारात राष्ट्राची चिंता सर्वप्रथम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री म्हणाले की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववादाचे वैज्ञानिक विवेचन केले होते. विकसित भारताची संकल्पना व्यक्ती, समाज आणि परिवार यांच्या परिघात साकार होऊ शकते असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. कृष्ण चंद पांडे यांच्या ‘संम्भवामि युगे-युगे’ या दोन खंडात लिहिलेल्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. अनुवाद व निर्वचन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. कृष्ण कुमार सिंह यांनी प्रस्ताविक केले तर वर्धा समाज कार्य संस्थानचे निदेशक प्रो. बंशीधर पांडे यांनी स्वागत भाषण केले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलन, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या फोटोवर पुष्पांजलि अर्पित करुन व कुलगीताने करण्यात आला. डॉ. जगदीश नारायण तिवारी यांनी मंगलाचरण सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भदंत आनंद कौसल्यायन बौद्ध अध्ययन केंद्राचे सहायक प्रोफेसर डॉ. कृष्ण चंद पांडे यांनी केले तर साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अखिलेश कुमार दुबे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

याप्रसंगी विश्‍वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया, प्रो. फरहद मलिक, प्रो. अवधेश कुमार, प्रो. गोपाल कृष्ण ठाकुर, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, डॉ. अशोक नाथ त्रिपाठी, डॉ. अनिल कुमार पाण्डेय, डॉ. रामानुज अस्थाना, डॉ. एच. ए. हुनगुंद, डॉ. राजेश लेहकपुरे, डॉ. रूपेश कुमार सिंह, डॉ. संदीप कुमार वर्मा, डॉ. रेणु सिंह, डॉ. गौरी शर्मा, डॉ. सारिका राय शर्मा, धर्मेंद्र शंभरकर, डॉ. रवि कुमार, डॉ. योगेन्द्र बाबू, डॉ. वागीश राज शुक्ल, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. राजीव रंजन राय, डॉ. मुन्ना लाल गुप्ता, डॉ. प्रदीप , डॉ. हिमांशु शेखर, डॉ. आर पुष्पा नामदेव, डॉ. मनोज तिवारी, सन्मति जैन, आनंद भारती, बी. एस. मिरगे, डॉ. अमित कुमार विश्वास, डॉ. अंजनी राय, डॉ. गिरीश पाण्डेय, डॉ. राम अवध, डॉ. श्रीनिके मिश्र, डॉ. अश्विनी कुमार सिंह, कमल शर्मा, राजीव पाठक, तुषार वानखेड़े, शुभम सोनी, निलेश मुंजे, अटल पाण्डेय, मिथिलेश कुमार, हेमंत दुबे, हिमांशु नारायण यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page