सेट परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे घवघवीत यश
छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी परीक्षेत (सेट) देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एकूण १४ विद्यार्थी पांडुरंग हरदास, रोहन निंबाळकर, विठ्ठल पैगण, शीतल राठोड, महेश गोरे, विशाल लोंढे, गोविंद बुधवंत, शिवचरण राठोड, विश्वजित ताक, अमृता गोजे, विजय फसाठे, रोहिणी कोलते, रणजित मुटकुळे यांनी यश संपादन करून विभागाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.
या विद्यार्थ्यांचे अभिनंदन म शि प्र मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे यांनी केले. तसेच या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ विष्णू पाटील, रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ रजिता इंगळे व विभागातील प्राध्यापक डॉ सतीश देशमुख, डॉ सुनील टेकाळे, डॉ अजित धस, डॉ विद्या डोफे, डॉ दत्तात्रय पानसरे, डॉ अनंत कणगरे, आनंद धिरबस्सी हे उपस्थित होते. तसेच उपस्थित सर्वानी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.