बी जे शासकीय महाविद्यालयात पश्चिम बंगाल मधील घटनेचा अभाविप व जिज्ञासा कडून निदर्शने
पुणे : दि ०९/०८/२०२४ रोजी एक अत्यंत क्रूर आणि लाजिरवाणी घटना घडली ज्यात आर जी कर मेडिकल कॉलेज, कोलकाता येथील रुग्णालयत ड्युटी वर असलेल्या एका महिला डॉक्टर वर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्येच लैंगिक अत्याचार आणि हत्या करण्यात आली.या घटनेने सर्व वैद्यकीय क्षेत्र आणि कार्यक्षेत्रावर भय आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निवासी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर आणि विशेषतः संपूर्ण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ह्याच घटने विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जिज्ञासा चे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी बी जे शासकीय महाविद्यालय, पुणे येथे निदर्शने केले. पुण्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी या निदर्शनात सामील होऊन पश्चिम बंगाल मधील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत होते. तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार विरोधात देखिल प्रदर्शन केले.
यावेळी अभावी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री ॲड अनिल ठोंबरे म्हणाले “पश्चिम बंगालमधील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. कोलकत्ता मध्ये महिलां विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराची घटना ही घटना पहिल्यांदा नसून ती वारंवार होताना दिसते व त्यावर कुठलेही ठोस पाऊल पश्चिम बंगालमधील ममता सरकार हे उचलत नाहीये. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आता देखील प्रश्न पडला आहे की कोलकाता मध्ये शिक्षण घ्यायचे का नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे नेहमी विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभी असते त्याच पद्धतीने ह्या घटनेनंतर ही अभावीप रस्त्यावर उतरून यावर आवाज उठवेल व महिलांच्या सुरक्षा विषयींचे प्रश्न शासना पर्यंत पोहचवेल.
मेडिविजन राष्ट्रिय संयोजक डॉ अभिनंदन बोकरिया म्हणाले “डॉक्टर्स २४ ते ३६ तास सलग काम करून रुग्णांना सेवा देत असतात. आज डॉक्टर आपल्या कार्यक्षेत्रातच सुरक्षित नाही आहे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे. यासाठी कामाच्या ठिकाणी महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना त्वरित केली गेली पाहिजे. तसेच जिज्ञासा राष्ट्रिय सह संयोजक डॉ रोहन मुक्के म्हणाले “महिला डॉक्टर वरील झालेले ही घटना अतिशय दुर्दैवी आहे व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेत सामील असणाऱ्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच देशभरात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी”.