शालिनीताई मेघे नर्सिंग महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर व्याख्यान संपन्न

विवेकानंदांच्या विचारांची आज गरज आहे – मदगोंडा पुजारी

वर्धा : युवकांनी आपल्या जीवनात सकारात्मकता जोपासण्यासाठी आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे महाराष्ट्र कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी, सोलापूर यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शालिनीताई  मेघे नर्सिंग महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात काढले.

Advertisement
delivered a lecture on De-addiction in Shalinitai Meghe College of Nursing

परिचारिका महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्यसनमुक्तीवरील व्याख्यानात पुजारी यांनी जीवनातील उद्दिष्ट्ये सध्या करण्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन केले. यावेळी विवेकानंद केंद्राचे युवा नेतृत्व प्रमुख मनोहर बारस्कर, व्यक्तिमत्व विकास प्रमुख सुभाष खुरपडे, शालिनीताई मेघे बी एस्सी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रंजना शर्मा, कॉलेज ऑफ जीएनएम नर्सिंगच्या प्राचार्य अख्तरीबानो सैय्यद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे संचालन करिष्मा दोड हिने केले तर आभार उपप्राचार्य मीनाक्षी चौधरी यांनी मानले. या आयोजनात प्रतिभा वानखेडे, सीमा येळणे, शबनम सैय्यद, मनीषा वाघ, सागर भोवरे, धनश्री सेलूकर, सार्थक मेघे, माधुरी खडतकर, अभिलाष साटोणे, प्रशासकीय अधिकारी प्रणिता पोहणेकर यांचे सहकार्य लाभले. या व्याख्यानाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page