दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे डॉ. सुरेश चांडक यांना अकॅडेमी डॉक्टर अवॉर्ड
भारतीय वैद्यकीय संघटनेद्वारे सन्मानित
वर्धा – सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागातील प्राध्यापक तथा ज्येष्ठ कर्करोग व लॅपरोस्कोपी सर्जन डॉ. सुरेशचांडक यांना इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे डॉक्टर्स दिनानिमित्त अकॅडेमी डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे आयएमए म्हणजेच भारतीय वैद्यकीय संघटना, नवी दिल्ली मुख्यालय आणि महाराष्ट्र राज्य शाखेद्वारे आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. चांडक यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद अग्रवाल, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर्स दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राज्यातील २१ डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. त्यात अकॅडेमी डॉक्टर पुरस्काराचे एकमेव मानकरी डॉ. सुरेश चांडक होते. डॉ. चांडक यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाकरिता अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, व्यवस्थापन मंडळ सदस्य सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांनी अभिनंदन केले आहे.