डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रणवला राज्य नेमबाजी स्पर्धेत कास्य
कोल्हापूर : डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेजचा ११ वी सायन्सचा विद्यार्थी प्रणव मुकुंद पवार याने राज्य शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली. या शानदार विजयामुळे प्रणवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन व संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. प्रणवने १९ वर्षाखालील गटात ओपन साईट प्रकारात कास्य पदक पटकावले आहे.
प्रणवला या यशासाठी कॉलेजचे प्राचार्य ए बी पाटील आणि क्रिडा शिक्षक प्रा सुदर्शन पोवार यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच, संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रणवचे हे यश कॉलेजसाठी आणि शहरासाठी अभिमानास्पद असून, त्याचे आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे प्रवास अधिक उज्जवल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.