डी वाय पाटील बी टेक ॲग्रीच्या अनुजची राहुरी विद्यापीठ हॉकी संघात निवड

तळसंदे : डॉ डी वाय पाटील बी टेक ॲग्रीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थी अनुज पाटील याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या हॉकी संघात निवड करण्यात आली आहे. राजस्थानमधील सुरेश ज्ञान विहार युनिव्हर्सिटी, जयपूर येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये अनुजने आपल्या उत्कृष्ट खेळाने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

D Y Patil B Tech Agri Anuj selected in Rahuri University Hockey Team
अनुज पाटील, डॉ डी वाय पाटील बी टेक ॲग्री

अनुजची निवड क्रीडा संचालक प्रा ए एस बंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बी पाटील, अकॅडमीक इन्चार्ज पी डी उके, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए बी गाताडे आणि रजिस्ट्रार आर पी शिंदे यांच्या प्रोत्साहनाने ही यशस्वी निवड शक्य झाली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आ ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी अनुजचे अभिनंदन करून त्याला पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com