डी.के.ए.एस.सी. व नाईट कॉलेजमध्ये सामंजस्य करार
इचलकरंजी : महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग यांच्या निर्देशानुसार ‘ नवीन शिक्षण धोरण सप्ताह ‘ महाविद्यालयांमध्ये साजरा होत आहे.या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने सदर सप्ताहात डिकेएएससी कॉलेजमध्ये विविध उपक्रम संपन्न होत आहेत.याचाच भाग म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी व नाईट कॉलेज, इचलकरंजी या दोन शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
प्रस्तुत करारा अंतर्गत दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रमांचे आदानप्रदान केले जाणार आहे.शिवाजी विद्यापीठाने प्रक्षेपित केलेल्या नव्या शिक्षण धोरणातील उच्च शिक्षण विषयक माहिती देणाऱ्या आभासी संवाद कार्यक्रमात आज महाविद्यालय सहभागी झाले होते. याप्रसंगी प्राध्यापकांची गटचर्चाही आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. पी.डी. नारे, डॉ.डी.सी.कांबळे,प्रा.डी.ए.यादव,डॉ.आर.एल. कोरे, डॉ. अर्जुन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभात दोन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.