सेवासदन येथे सोलापूर विद्यापीठाच्या साइबर वारियर्स ने केली साइबर सुरक्षेवर जनजागृती
सोलापूर : सोलापूर मधील सेवासदन या प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणक शास्त्र संकुल व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये संगणक शास्त्र संकुलातील मालती जाधव व सायली शेळके या विद्यार्थिनींनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर सेमिनार दिले. या सेमिनार मध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल महिती दिली. अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेल्या कॉल ची पडताळणी करून घेणे, पासवर्ड स्ट्राँग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी तसेच आपली महिती ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले. मोबाईल, कॉम्प्युटर , लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटीव्हायरस चा वापर करावा. या कार्यक्रमास एकूण २७० विद्यार्थी व सेवासदन प्रशालेचे मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे व सर्व शिक्षक उपस्थित होते. सहशिक्षिका प्रणोती रायखेलकर यांनी आभार मानले.