रूपाभवानी माता मंदिरात सोलापूर विद्यापीठाच्या साइबर वारियर्स ने केली साइबर सुरक्षेवर जनजागृती
सोलापूर : सोलापूर चे प्रसिद्ध देवस्थान रूपाभवानी मातेच्या मंदिरात सोलापूर विद्यापीठ मधील साइबर वारियर्स ने “साइबर शिक्षा फॉर साइबर सुरक्षा” उपक्रमद्वारे केली. साइबर सुरक्षेवर जनजागृती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या “साइबर शिक्षा फॉर साइबर सुरक्षा” उपक्रमद्वारे रूपाभवनी मातेच्या गाभारह्यात जमलेल्या भक्तानां रिद्धी खोकले व प्राजक्ता सरवदे ह्या संगणक शास्त्र संकुलातिल विद्यार्थिनीनी दि ४ ऑक्टोबर २०२४ रोजी साइबर सुरक्षेबाबत ची माहिती दिली.
ह्या उपक्रमद्वारे त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामधे होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल सांगितले तसेच अश्या फसवणुकी होऊ नयेत म्हणून उपाय सांगितले. अनोळखी नंबरवरुन आलेले फ़ोन कॉल्स, व्हाट्सऐप वरुन किंवा इतर सोशल मीडिया ऍप्स वरून आलेले मेसेजेस व लिंकची शहानिशा करून पुढील प्रक्रिया करावी. आपली माहिती हि आपली जबाबदारी असे सांगत त्यांनी ऑनलाइन उपकरणांच वापर योग्य पद्धतीने करण्याबाबत सांगितले.
त्याचबरोबर जर अश्या फसवणुकी झाल्यास आपण 1930 ह्या साइबरक्राइम च्या हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवू शकता असे सांगितले.