जि प शाळेत सोलापूर विद्यापीठाच्या सायबर वॅरियर्सने दिले सायबर सुरक्षेचे धडे
हिप्परगे तळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल, क्विक हिल फॉउंडेशन, पुणे व यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील प्रविण कोळी व सिद्रामय्या स्वामी या विद्यार्थ्यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या विषयावर सेमिनार दिले.
या सेमिनार मध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणान्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्धल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्धल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉग वापरून आपली माहिती सुरक्षीत करावी तसेच आपली माहिती हि आपली जबाबदारी आहे असे सांगितले. मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा.
या कार्यक्रमास विद्यार्थी व मुध्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षिका स्टाफ उपस्थित होते. तथा गावातील युवक सचिन पवार, वैष्णव बचुटे, पंकज राऊत, अजय सुरवसे, विशाल रेवजे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.