अमरावती विद्यापीठात किडनी स्टोन आजारावर मात करण्यासाठी ‘क्रश कॅप्सुल’ लाँच होणार
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, मे. अप्रोप्रिएट डायट आयुर्वेदा, नागपूर आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने किडनी स्टोन (मुतखडा/ मुत्राश्मरी) आजारावर मात करण्यासाठी ‘क्रश कॅप्सुल’ लाँच करण्याचा भव्य उद्घाटन कार्यक्रम दि. 6 फेब्राुवारी, 2024 रोजी अप्रोप्रिएट आयुर्वेदा, एम. आय. डी. सी., बुटीबुरी, नागपूर याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. किडनी स्टोन वर मात करण्यासाठी हा पहिला आयुर्वेदिक प्रयोग आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अप्रोप्रिएट ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक तथा शास्त्रज्ञ भारतगौरव डॉ. एस. कुमार भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे अध्यक्ष तथा नामवंत शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
तरी सदर उद्घाटन कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, जीवतंत्रशास्त्र विभागातील वरीष्ठ प्राध्यापक डॉ. अनिता पाटील, अप्रोप्रिएट आयुर्वेदाच्या संचालक डॉ. भाग्यश्री व नेचर सोल कंपनीचे संचालक अविनाश तांबे यांनी केले आहे.