डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन “सीपीआर जनजागृती सप्ताह” साजरा

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आपत्कालीन वैद्यक विभागाने अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनात दिनांक १ ते ७ जून 2025 दरम्यान डॉ पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने “सीपीआर जनजागृती सप्ताह” साजरा केला.

Emergency CPR Awareness Week celebrated at Dr Punjabrao Deshmukh Memorial Medical College and Hospital

दिनांक २ जून रोजी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी बीएलएस प्रशिक्षण घेण्यात आले, ज्यामध्ये प्रौढ, लहान मुले, बाळं, गरोदर महिला यांच्यासाठी सीपीआर आणि ‘चेन ऑफ सर्वायवल’ यांचा समावेश होता. हे सत्र डॉ सुदेश दारव्हेकर (सहाय्यक प्राध्यापक, आपत्कालीन विभाग) यांनी घेतले. विभागप्रमुख डॉ पी आर सोमवंशी यांनी सीपीआर हे “मूलभूत नव्हे तर अत्यावश्यक जीवनसाहाय्य” असल्याचे अधोरेखित केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख व डॉ पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिटयूट प्राचार्य डॉ विवेक वेदा यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. नर्सिंग स्टाफ सिद्धांत नारायण हे सीपीआर टीमचा भाग होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com