अमरावती विद्यापीठातील कोरोना लॅब समाजासाठी ठरली वरदान – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
विद्यापीठातील कोरोना लॅबला 4 वर्ष पूर्ण
अमरावती : विद्यापीठातील कोरोना लॅबचे कार्य समाजासाठी वरदान ठरले आहे. 2020 ला कोरोनाची लाट जगभर पसरली आणि भारतात शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला लोकांच्या मनामध्ये मृत्युबाबत प्रचंड भिती निर्माण झाली. कोरोना झाल्यानंतर त्याची तातडीने तपासणी होणे आवश्यक होते, परंतू तपासणी प्रयोगशाळा सुरुवातीला अतिशय मर्यादित आणि लांब दूर असल्यामुळे पेशन्ट दगावण्याचे प्रमाण वाढले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेवून आणि धोका पत्करुन कोरोना लॅब विद्यापीठामध्ये 4 मे, 2020 ला सुरु केली. आज त्या लॅबला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून तातडीने तपासण्या करुन दिल्यामुळे रूग्णांवर तातडीने उपाचार झालेत. ही लॅब खऱ्या अर्थाने समाजासाठी वरदान ठरली, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले.
कोरोना प्रयोगशाळा सुरु होवून 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी राज्यपाल नामित व्य प सदस्य डॉ रविंद्र कडू, व्य प सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, कोरोना प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ प्रशांत ठाकरे, तांत्रिक अधिकारी डॉ निरज घनवटे, पॅथॅलॉजिस्ट डॉ मुकेश बारंगे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर तसेच प्रयोगशाळेत कार्यरत तंत्रज्ञ व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोना लॅबकरीता 1.25 कोटी रूपयांची यंत्रसामुग्री शासनाने विद्यापीठाला दिली आणि ती लॅबमध्ये स्थापित करण्यात आली. लॅबमधील प्रत्येक यंत्रसामुग्रीच्या कार्यपद्धतीचे कुलगुरूंनी बारकाईने निरीक्षण करुन उपस्थितांकडून माहिती जाणून घेतली. पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले, अमरावती जिल्ह्राकरीता विद्यापीठात सुरु झालेल्या कोरोना लॅबमुळे पेशन्टचा तपासणी अहवाल तातडीने दिल्या गेला. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. या लॅबमुळे मृत्यु दर खूपच कमी झाला. ही लॅब खयाअर्थाने समाजासाठी वरदान ठरली. जवळपास 5 लक्षहून अधिक सॅम्पल्स आजवर या लॅबमधून तपासले गेले आहेत. कोरोनाच्या दुसया लाटेत मोठ्या प्रमाणावर जनतेला कोरोनाची लागवण झाली, त्यामुळे 24 न् 7 ही लॅब कार्यरत होती.
याठिकाणी कार्यरत शिक्षक, डॉक्टर्स, तंत्रज्ञ, संशोधक विद्यार्थी तसेच सहाय्यक यांनी तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करुन दररोज 3500 चे वर सॅम्पल्सची तपासणी केली. याचा परिणाम म्हणून बाधित नागरिकांवर लवकरात लवकर उपचार झाला आणि मृत्यु दर अत्यल्प राहिला. या लॅबचे नोडल अधिकारी डॉ प्रशांत ठाकरे, तांत्रिक अधिकारी डॉ निरज घनवटे, पॅथॅलॉजिस्ट डॉ मुकेश बारंगे तसेच लॅब अॅनालिस्ट डॉ सुधीर शेंडे, प्रज्ञा साऊरकर, नीलु सोनी, पुजा मांडविय, योगेश बेले, सचिन अवचार, अक्षय चांभारे, अक्षय शिंदे, यश गुप्ता, अमृता कासुलकर, राधिका लोखंडे, उभाड, विभुती, अनुजा, चंचल अडगोकर, उदय तितरे, वेद नंदलवार, धनराज राठोड, धनंजय लंबुवार, अनाम सय्यद, दुर्गेश्वरी निचत, मयुरी गहरवाल, कृतिका देशमुख, अश्विनी देशमुख, रेणुका येंडे, नेहा काळे, शुभदा माहुरे, रेश्मा धर्माळे, सिमा, पल्लवी बोके, हटवार याशिवाय डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील, प्रणव देशमुख, निकीता धर्माळे, गौरव रंगे, निलेश सरदार, प्रसाद पुरबे, प्रवीण नेवारे, शैला गारुडी या सर्वांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल कुलगुरूंनी त्यांचे कौतुक केले.
संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार विद्यापीठ चालत असून कोरोना लॅबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा एक उच्चांक विद्यापीठाने प्रस्थापित केला आहे. याप्रसंगी कुलगुरूंनी सर्वांचे अभिनंदन केले.