डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ कुलपती सी पी राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सोहळा पार पडणार
उपराष्ट्रपती जगदीश धनखड आज शहरात
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण
एक तासापूर्वी नाट्यगृहात उपस्थित राहावे लागणार
छत्रपती संभाजीनगर : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे शनिवारी दि २२ शहरात येत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळयाचे प्रमुख पाहुणे हे उपस्थित राहणार आहेत.




डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दि २२ संपन्न होणार आहे. नाट्यगृहात दुपारी तीन वाजून विस मिनिटांनी सदर कार्यक्रम होईल. खा डॉ भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणारआहे. यावेळी कुलगुरु डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, संचालक डॉ भारती गवळी, वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड यांच्यासह चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी दुपारी दोन वाजण्यापूर्वीच नाट्यगृहात उपस्थतीत राहावे लागणार आहे. तशा प्रकारची सूचना विद्यापीठ व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या सोहळ्याचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून तसेच समाज माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
’एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी आंबा, चिकु व जांभुळची रोपे लावण्यात येणार आहेत.