संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन उपस्थितांनी केले. याप्रसंगी कुलगुरूंनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे उपस्थित होते.
संविधान दिनाबद्दल विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी माहिती देऊन संविधान दिनाचे महत्व सांगितले. संविधान दिन कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ निलेश कडू, आय क्यु ए सी संचालक डॉ संदीप वाघुळे तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.