उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणावर प्राचार्यांची कार्यशाळेचे आयोजन

जळगाव : नवीन शैक्षणिक धोरणाची पदवी स्तरावर अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रात केली जाणार असून त्याअनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवार दि ९ मे रोजी संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. दि ९ मे रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात दिवसभर ही कार्यशाळा होणार असून वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्य व आंतरविद्या शाखा यांची अभ्यासक्रम रचना यावर विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.

Advertisement
KBCNMU-GATE

यामध्ये अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे, प्राचार्य एस एस राजपूत, प्रा जगदीश पाटील हे सहभागी होणार आहेत. स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य एस एन भारंबे, प्राचार्य प्रिती अग्रवाल आणि प्राचार्य ए बी जैन हे त्यांचे अनभव सांगणार आहेत. प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे भूमिका मांडतील. मूल्यांकन आणि मूल्यमापन यावरही चर्चा होईल. दुपारी ०३:३० वाजता कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या उपस्थितीत समारेाप होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page