देवगिरी महाविद्यालयात संशोधनावरील मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
“संशोधन विश्वातील विविध पैलूंचे दिशादर्शन: एक सखोल मार्गदर्शन” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाद्वारे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ०१ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन प्रो गिरीश जोशी, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, मराठवाडा विभाग, जालना यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे असणार आहेत.
कार्यशाळेचे पहिले सत्र ‘संशोधन पद्धती: सामाजिक शास्त्रातील संशोधकांसाठी विविध क्लृप्त्या‘ या विषयावर प्रो गिरीश जोशी हे मार्गदर्शन करणार असून, दुसऱ्या सत्रात ‘संशोधन संकल्पना आणि संशोधन पद्धती’ या संदर्भात प्रो शरद शेळके तर, तिसऱ्या सत्रात प्रो धर्मराज वीर हे ‘गुणात्मक संशोधनातील वाड:मयचौर्य: शोध आणि प्रतिबंधात्मक उपाय ‘ भाष्य करणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘क्षेत्र अध्ययन: तंत्र आणि कौशल्ये’ यावर डॉ. संग्राम गुंजाळ मार्गदर्शनकरणारअसून, ‘संशोधनातील सांखिकीय तंत्राचा वापर’ यावर डॉ. पुरुषोत्तम देशमुख हे मार्गदर्शन करतील तर, ‘सामाजिक शास्त्रातील परीमाणात्मक संशोधन पद्धतीचा वापर’ यावर प्रो शुजा शाकीर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळेसाठी संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी कार्य शाळेस उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, कार्यशाळेचे संयोजक तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो डॉ श्याम कदम, उपप्राचार्य डॉ दिलीप खैरनार, उपप्राचार्य डॉ अनिल अर्दड, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, प्रा गोविंद खाडप, प्रा वर्षा कोरडे, डॉ दीपक बहिर, डॉ गौतम गायकवाड, प्रा सौरभ गिरी यांनी केले आहे.