उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

 जळगाव : एम. एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या केंद्रीय प्रवेश परीक्षेकरीता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातर्फे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जाणार असून सीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज देखील या विभागामार्फत मोफत भरून दिले जात आहेत. माहितीपुस्तिका, अर्ज व प्रवेश प्रक्रियेसाठी विहीत शुल्क भरण्यासाठी दि. १० जानेवारीपासून https://mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून दि. २९ जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मूदत आहे. बी. एड उत्तीर्ण अथवा प्रविष्ठ तसेच डी. टी. एड उत्तीर्ण विद्यार्थी केंद्रीय प्रवेश परीक्षेसाठी पात्र आहेत. शिक्षणशास्त्र विभागामार्फत ऑनलाईन अर्ज मोफत भरून दिले जात आहेत.

Advertisement
Conducting guidance class for admission to M Ed course in kbcnmu

अधिक माहितीसाठी विभागप्रमुख डॉ. मनीषा इंदाणी अथवा डॉ. संतोष खिराडे यांच्याशी ०२५७-२२५८४३१/४३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page