बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी एमजीएम विद्यापीठात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व खुले करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाईल. त्यात प्रामुख्याने अर्थशास्त्रातील ऑनर्स पदवी (४ वर्षे) आणि मास्टर्स पदवी (२ वर्षे) या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जाईल. दिनांक २ मे ते १५ मे २०२४ या कालावधीत हे करिअर मार्गदर्शक शिबिर सर्वांसाठी मोफत व खुले आहे.
या शिबिरात अर्थशास्त्र विषयक शिक्षणाचे स्वरुप, गुंतवणूक, वित्तीय विश्लेषण, डाटा अॅनालिटिक्स, बँकिंग, इन्शुरन्स, मार्केट रिसर्च, सामाजिक-आर्थिक संशोधन, डाटा व्यवस्थापन, माहिती संकलन, माहितीचे विश्लेषण, कन्सल्टन्सी, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक संस्था, धोरण निश्चिती, शासकीय सेवा आणि उद्योजकता इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना अर्थसास्त्रातील राष्ट्रीय – आंतररष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक करिअर विषयी देखील माहिती दिली जाईल.
या शिबिरात अर्थशास्त्राचे तज्ञ प्राध्यापक अर्थशास्त्रातील पदवी शिक्षणातून औद्योगिक क्षेत्र, व्यापार, सेवा, शासकीय धोरण निश्चिती, शासकीय सेवा, गुंतवणूक, वित्तीय विश्लेषण, डाटा अॅनालिटिक्स, बँकिंग, इन्शुरन्स, मार्केट रिसर्च, सामाजिक व आर्थिक संशोधन, डाटा व्यवस्थापन, माहिती संकलन, माहितीचे विश्लेषण, कन्सल्टन्सी, सामाजिक उद्योजकता, व्यावसायिक उद्योजकता, लोकसंवाद माध्यमे, पर्यटन, हॉटेल्स, वाहतुक, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था इत्यादी प्रकारच्या नोकर्यांबद्दल माहिती देतील.
इच्छुक विद्यार्थी व पालकांनी एमजीएम विद्यापीठास भेट द्यावी किंवा फोन क्रमांक २४०-६४८११९, मो. क्रमांक ७०३०९०१०७४ यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.