गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत (जीएमएनआरडी) आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले.
सत्रांचे विषय हे डिजिटल टेक्नॉलॉजी, वुमन एम्पॉवरमेंट अँड जेंडर इक्वालिटी आणि पंचायत राज आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असे होते. या सत्रांमध्ये अनेक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यात अध्यक्ष या नात्याने प्रा एम डी शिरसाट यांनी मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थी कशाप्रकारे जगातील अनेक देशांमधील शिष्यवृत्ती मिळवू शकतात व आपले करिअर घडू शकतात याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. परिषदेसाठी गोव्याहून डॉ अरविंद हळदणकर हे मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
प्रा स्मिता अवचार यांनी विद्यार्थ्यांना संशोधन अधिक प्रभावीपणे करण्यासंदर्भात सूचना केल्या. दिवसभर चाललेल्या सत्रामध्ये प्रा बी के साखळे, प्रा खाजा शुजाउद्दीन शाकीर, प्रा लक्ष्मण साळोख, प्रा घनश्याम येळणे, प्रा विना हुंबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संचालक प्रा संजय साळुंके यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा उपस्थित प्राध्यापक संशोधक व विद्यार्थी यांच्यासमोर सादर केला व येणाऱ्या काळात गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था ही खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाशी संबंधित समस्या सोडवण्यात एक मोठी भूमिका निभावेल असे आपले मत व्यक्त केले.
परिषदेच्या आयोजनासाठी डॉ कृष्णा कांबळे, डॉ उषा वटाणे, डॉ शैलेश माकणीकर, डॉ बाळासाहेब बोधणे, डॉ राहुल महामुनी, डॉ नीता कळसकर, प्रा सुनील गलाटे, वरिष्ठ सहाय्यक सोमीनाथ वाघ, हेमंत येपुरवार, पुंडलिक पवार, अनिकेत घुगे यांनी परिश्रम घेतले.