गोंडवाना विद्यापीठातर्फे झाडीबोली नाट्यसंमेलनात विविध स्पर्धांचे आयोजन
गडचिरोली : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे दिनांक ०५ मार्च २०२४ रोजी, झाडीबोली नाट्यसंमेलन घेण्यात येत आहे. या अंतर्गत झाडीबोली नाट्यकलेचा जागर व स्पर्धा महोत्सव होणार आहे. झाडीपट्टीतील सामाजिक समस्या, भाषा, बोली,आचार- विचार संस्कृती, याची ओळख व अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि झाडीपट्टी रंगभूमीचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाने गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या झाडीबोली नाट्य संमेलनामागचा हेतू आहे.
या झाडीबोली नाट्य संमेलनात एकांकिका व एकपात्री,नाट्यछटा स्पर्धा ,
अभिनय स्पर्धा घेण्यात येत आहेत. रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषक असे स्पर्धांचे स्वरूप राहणार आहे.
सर्वोत्कृष्ट एकांकिका पारितोषकः ८०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट एकांकिका: ४०००/ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ एकांकिका : २०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
संहिता लेखन/ दिग्दर्शन/ स्त्री अभिनय/ पुरुष अभिनय यासाठी प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट पारितोषिक , सर्वोत्कृष्ट : २००० /- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
एकपात्री अभिनय / नाट्यछटा
सर्वोत्कृष्ट: ४००० /- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट : २०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ: १०००/ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
सर्व कलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.असे पारितोषिकांचे स्वरूप राहणार आहे.
तरी या नाट्यसंमेलनात गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे व स्पर्धकांनी ९५०३०८१७९० या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे नाट्यसंमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. निळकंठ नरवाडे यांनी कळविले आहे.