उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीत एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाला प्रारंभ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीत दि ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाला प्रारंभ होत आहे.
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून एम एस डब्ल्यू हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आदिवासी अकादमी नंदुरबार येथे सुरु होत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाली असून शुक्रवारी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. उद्या जागतिक आदिवासी दिवस असून या समारंभासाठी कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य महेंद्र रघुवंशी हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अकादमीचे प्रभारी संचालक प्रा के एफ पवार यांनी दिली.