मिल्लिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने तर्फे कामखेडा येथे स्वच्छता अभियान

बीड : येथील मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौजे कामखेडा ता. बीड येथील विशेष शिबिरामध्ये मंदिर-मस्जिद, ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तसेच गावातील समाजसेवक अमीर बशीर पटेल, भारत दादा नेवडे व इतर नागरिक यांनी परिसर स्वच्छ केला.

Advertisement
Cleanliness campaign at Kamkheda by National Service Scheme of Millia College

तेथील प्लास्टिक बॅग, रिकाम्या पाणी बाटल्या व कचरा जमा केला. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग,डॉ. शेख रफीक व डॉ. शेख एजाज परवीन तसेच गावातील नागरिक यांनी सहकार्य केले.स्वच्छता अभियान कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page