श्री बंकटस्वामी महाविद्यालयात बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम संपन्न
बालविवाह प्रथा निर्मूलनासाठी युवकांनी समाज जनजागृती करावी – डॉ जयराम ढवळे
बीड : श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या बौद्धिक सत्राच्या कार्यक्रम प्रसंगी बालविवाह निर्मूलन या विषयावर डॉ. जयराम ढवळे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील त्रिभुवन हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे डॉ शंकर शिवशेट्टी डॉ. प्रकाश कोंका व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ जयराम ढवळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की बालविवाह याला कायदेशीर जरी बंदी असली तरी समाजाने जागृत होऊन अशा घटना होऊ नयेत आपापल्या गावांमध्ये जाऊन तरुणांनी एक समिती तयार करावी व अशा पद्धतीने एखादा विवाह होत असेल तर त्यांना कायदेशीर समज देऊन व जागृती करावी की याचे परिणाम काय होतात हे समाजाला जाणीव करून देणे आवश्यक आहे जेणेकरून अशा घटना आपल्या आजूबाजूला होणार नाहीत आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या शेजारी कुठे असा प्रकार निदर्शनास आला तर तात्काळ प्रशासनाला देखील सूचना द्याव्यात व आपण आपल्या समाजामध्ये जनजागृती करावी असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका छाया सोंडगे प्राध्यापिका वर्षाताई भोसले प्राध्यापिका डॉ दीपमाला माने प्राध्यापिका डॉ नीता बावणे तसेच ग्रामस्थ स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ शंकर शिवशेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजीत आखाडे यांनी मानले.