मिल्लिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कामखेडा येथे बालविवाह : जाणीव जागृती अभियान

बीड : येथील मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कामखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ” सक्षम युवा समर्थ भारत”  युवा-युवती विशेष हिवाळी शिबिरा मध्ये शनिवार दि 21 जानेवारी 2024 रोजी बालविवाह होऊ नयेत यासाठी बालविवाह : जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. मुलींचा विवाह 18 वर्षानंतर व मुलाचा विवाह 21 वर्षानंतर करण्याबाबत घरोघरी जाऊन जाणीव जागृती करण्यात आली. लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी प्रभावशाली घोषवाक्यांचे स्टिकर्स गावातील दर्शनीय ठिकाणी तसेच घरांच्या दारावर लावण्यात आले.

Advertisement
Child Marriage : Awareness Campaign in Kamkheda of National Service Scheme of Millia College

गावातील लोकांनी निश्चय केला कि, आम्ही बालविवाह करणार नाहीत. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्षात व अप्रत्यक्ष मदत करणार नाही. आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाहीत याची दक्षता  घेऊत तसेच बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी समजामध्ये जागृती निर्माण करु व आपला बीड जिल्हा बालविवाह मुक्त करू. यावेळी कार्यक्रमात शेख शफिक (उपसरपंच), डॉ. अब्दुल अनिस, शेख मुसा (ग्राम पंचायत सदस्य) जीवन पवार (माजी सरपंच) शेख सलीम, गावातील नागरिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी, कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफीक व डॉ. शेख एजाज परवीन उपस्थित होते. बालविवाह : जाणीव जनजागृती अभियान कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page