‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराजी यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, विद्युत उपअभियंता अरुण धाकडे, सहा कुलसचिव रामदास पेदेवाड, रवि मोहरीर, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, रामदास साळुंके, शिवलिंग पाटील, कुंदा पाटील यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com