मुक्त विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांनी पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी केले, तर आभार सेवा सुविधा कक्षाचे सुनिल निकम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com