अमरावती विद्यापीठात छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी

अमरावती : छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page