अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील काही परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

ज्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये एम स्सी (बॉटनी) सेमि -1 (एन ई पी), एम एस्सी (मायक्रोबॉयलॉजी) सेमि -1 (एन ई पी), एम ए (योगशास्त्र) सेमि -1 (एन ई पी) व एम पी ए (ड्रामा थिएटर) सेमि -1 (एन ई पी) या परीक्षांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे.

तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांना 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com