अमरावती विद्यापीठांतर्गत हिवाळी-2023 पर्यायी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातंर्गत क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठीय पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले असून काही अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
याची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र, महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी नोंद घ्यावी व अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील यांचेशी 9763833969 या संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे