मिल्लीया महाविद्यालयात सिरॅमिक पेंटिंग प्रदर्शन

बीड : येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जेंडर सेंसीटायझेशन सेलच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी सिरॅमिक पेंटिंग प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, जेंडर सेंसीटायझेशन सेलच्या अध्यक्ष तथा प्रदर्शन आयोजिका प्रो सय्यदा सीमा हाश्मी, संयोजिका डॉ. शामल जाधव यांची उपस्थिती होती. प्रदर्शनाचे उद्दिष्ट कौशल्य विकास आणि संवर्धन हे होते. प्रदर्शनात 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

Advertisement
Ceramic Painting Exhibition at Millia College

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मोहम्मद इलयास फाजील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सिरॅमिक पेंटिंग प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. सिरॅमिक पेंटिंग प्रथम क्रमांक नजीफा तहेसीन शेख रफिक, द्वितीय क्रमांक उम्मे कुलसुम वाजेद अहमद, तृतीय क्रमांक सबा फातिमा अमजद खान तसेच उत्तेजनार्थ इकरा इरम वाजेद अहमद व शेख फरहा मोईन यांना मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस. एस. यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो सय्यदा सीमा हाश्मी यांनी केले तर आभार डॉ. शामल जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास जेंडर सेंसीटायझेशन सेलचे सर्व सदस्य तसेच विद्यार्थिनीं यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page