यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, समवेत कुलसचिव दिलीप भरड, भटूप्रसाद पाटील, डॉ गोविंद कतलाकुटे, प्रमोद भडकवाडे आदी.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष साबळे यांनी केले, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले कार्यक्रमास विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रमोद भडकवाडे तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com