‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि १० मे रोजी (तिथीनुसार) महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ रवि एन सरोदे, हुशारसिंग साबळे, सहा कुलसचिव रवि मोहरीर, विलास साळवे, पंडित माने, दिनेश निंगदळी, सुनिल जाधव, नारायण गोरे, रामदास खोकले, जगदिश चित्ते, गंगाधर गुंडेराव, दिपक हंबर्डे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com