‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदिश कुलकर्णी, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, सहा कुलसचिव डॉ सरिता यन्नावार-लोसरवार, रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ लक्ष्मीकांत आगलावे, शिवराम लुटे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com