‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये सद्भावना दिनानिमित्त शपथ घेत सद्भावना दिन साजरा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवसानिमित्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी उपस्थित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांना सद्भावनेची प्रतिज्ञा दिली.

यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ डी एम खंदारे, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदीश कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ रवि सरोदे, व्यंकट रामतीर्थे, मेघश्याम सोळंके, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, सहा कुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा मुंगल, डॉ लक्ष्मीकांत आगलावे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्गीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com