शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिन शपथ घेत सद्भावना दिन साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शांती व अहिंसा यांची शपथ घेत सद्भावना दिन साजरा करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले यांनी सर्व उपस्थितांना सद्भावना शपथ दिली.

यावेळी कुलसचिव डॉ विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील, व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ रामचंद्र पवार, क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com