देवगिरी महाविद्यालयात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी ‘कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य विभागात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, प्रमुख व्याख्याते म्हणून सीएस कोमल मुथा छत्रपती संभाजीनगर चॅप्टर (आय सी एस आय), उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागप्रमुख प्रो डॉ राजेश लहाने यांनी वाणिज्य विभागात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आणि त्यासाठी आवशयक असलेल्या विविध सोयी – सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य कंपनी सेक्रेटरी कोर्सचे महत्व सांगताना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विध्यार्थ्यांना भारतात आणि भारताबाहेर असलेल्या विविध संधीबद्दल माहिती दिली.
उपप्राचार्य प्रा विष्णू पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये वाणिज्य पदवी सोबतच इतर व्यावसायिक कोर्सेससोबत विद्यार्थ्यांनी आपले करिअर विकसित करता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज जीवनामध्ये आपल्या वरिष्ठांसोबत अथवा सहकाऱ्यांसोबत कसे वागावे या विषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख व्याख्याते सी एस कोमल मुथा यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये कंपनी सेक्रेटरी संदर्भातील संधी व कोर्स करता असताना येणाऱ्या अडचणीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कंपनी सेक्रेटरी’ कोर्सचा कालावधी, अभ्यासक्रम, कोर्स केल्यानंतर कोठे कोठे संधी उपलब्ध आहेत, याविषयी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केली व शेवटी प्रश्नोत्तराने व्याख्यानाचा समारोप केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते असे म्हणाले, देवगिरी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामांकित महाविद्यालय असून विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विभाग कार्यरत आहेत, जसे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाट्यशास्त्र विभाग अश्या विविध विभागातील संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख प्रा डॉ राजेश लहाने यांनी केला. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ विवेक वायकर यांनी केले. यावेळी वाणिज्य विभागातील 200 विद्यार्थी उपस्थित होते.