महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात नविन बांधण्यात आलेल्या कॅन्टीन (मेस) बिल्डींगचे उत्साहात उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : दिनांक ०४/०५/२०२५ (रविवार) रोजी सकाळी १०:४० वाजता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या विद्यार्थीकरीता नविन बांधण्यात आलेल्या कॅन्टीन (मेस) बिल्डींगचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रथमतः विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ बिंदू एस रोनाल्ड यांच्या स्वागत भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व त्यांनी आलेल्या सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचे हार्दीक स्वागत कले. त्यांनी पुढी असे ही सांगितल की, सदरची मेस बिल्डींग मध्ये १००० पेक्षा जास्त् विद्यार्थाची जवणाची सोय उपलब्ध झाली आहे.

सदरील कार्यक्रमामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आणि आणि विद्यापीठाचे कुलपती अभय एस ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती न्यायमूर्ती रवींद्र घुगे, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे न्यायमुर्ती मंगेश पाटील आणि मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील सर्व विद्यमान आणि माजी न्यायायमुर्ती, वकील बारचे अध्यक्ष, सचीव व इतर मान्यवर जेष्ट वकिल मंडळी, विद्यापीठाचे कलगुरु बिंदु एस रोनॉल्ड, कुलसचीव धनाजी एम जाधव, उप-कुलसचीव निवृती गजभारे, मान्यवर जेष्ट वकील मंडळी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी उपस्थितीत होते.
सदरील वर नमूद केलेल्या कार्यक्रमानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विस्वनाथन यांचे “एकविसाव्या शतकातील विधी व्यवसायाची संकल्पना विधी विद्यापीठांची भूमीका ” या विषयावर विद्यापीठाच्या मुटकोर्ट हॉल (सीईओ बिल्डींग) मध्ये परिसंवाद / व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदरील काग्रक्रमाचे अध्यक्षस्थान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती अभय एस ओक यानी भुषविले.
सदरील कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती रवींद्र घुगे व मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमुर्ती मंगेश पाटील हे उपस्थितीत होते, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विस्वनाथन यांनी त्यांच्या परिसवांदमध्ये असे संबाधले की, कायदेशीर शिक्षणामध्ये व कायदेशीर प्रक्रीयामध्ये कृत्रिम बुद्धिमतेच्या नेतृत्वाखाली बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा गरजेवर भर दिला तसेच त्यांनी समाजाकरीता कायद्याचे किती महत्वाचा आहे यावर प्रकाशझोत टाकला.
त्यानंतर प्रश्न उत्तरचे सत्र सुरु झाले तेव्हा त्यामध्ये डॉ अशोक वडजे, अँड थिगळे, एम पी लॉ कॉलेजचे प्राचार्य सी एम राव, ज्येष्ठ विधिज्ञ आर एन धोर्ड पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डी एम जाधव, प्रा अब्दुल हकीम यांनी कायदयाच्या शिक्षणातील त्रुटीसंर्दभाबाबत असलेल्या शंकेविषयी प्रश्नोत्तरच्या सत्रामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला त्यावेळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विश्वनाथन व अभय एस ओक यांनी त्यांना समर्पक व कायदाला निगडीत असलेली उत्तरे देण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे व मान्यवरांशी कायद्यायच्या क्षेत्रातील विविध मुद्यावर व संधीवर केलेल्या चर्चमध्ये प्रेक्षकांचा संवाद व सहभाग दिसुन आला सदरील कार्यक्रमामध्ये विद्यापीठाने त्यांचे अधिकृत वृत्तपत्र “लॉरेल्स” हे विद्यापिठातील दिवसभराच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले. शेवटी विद्यापीठाचे कुलसचिव डी एम जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.