महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शुक्रवारी कर्करोग निदान व उपचार शिबीर

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शुक्रवार, दि 09 ऑगस्ट 2024 रोजी कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजात कर्करोग रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. रोगांना दूर ठेवण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कुलगुरु यांच्या या संकल्पनेतून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मुख्यालयात प्रसिध्द कॅन्सरतज्ज्ञ डॉ सदानंद सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबीराचा सकाळी 10ः00 वाजता प्रारंभ होणार आहे. विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित शिबिरात नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com