सौ के एस के महाविद्यालयात कॅम्पस इंन्टरव्हयू संपन्न
बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व माविन प्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने कॅम्पस इन्टरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माविन प्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सोनाली सरवदे के अकाऊंट मॅनेजर, प्रसन्ना कुलकर्णी रिक्रुटमेंट प्रॅक्टीस लिडर हे उपस्थित होते. कंपनीच्या प्रमुख अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॅम्पस इंन्टरव्हयुचे फायदे समजावून सांगितले.
यावेळी बी ए, बी एस्सी व बी कॉम तृतीय वर्षाचे व नियमित विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी कॅम्पस इन्टरव्हयूसाठी उपस्थित होते. या कॅम्पस इन्टरव्हयूसाठी एकूण ५८ विद्यार्थ्यांची उपस्थित होते. यापैकी मुलाखतीमध्ये एकूण २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये मुले १२ व मुली १० अशी मुलाखत देणार्यांची संख्या होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर हे होते. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व कॅम्पस इन्टरव्हयूचे महत्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान ए एस यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ पंडित खाकरे यांनी केले तर आभार डॉ अनिता शिंदे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.